Sunday, October 28, 2012

Shikra

Shikra (Accipiter badius) Local Name(Marathi):शिक्रा
Location : Karvenagar, Pune


सकाळी ऑफीसला जाण्याची गडबड चालू असताना घराच्या मागील बाजूस वड-पिंपळ झाडावर अचानक पक्षांचा किलबिलाट ऐकू आला. तसा नेहमीच असतो. पण हा नेहमी पेक्षा वेगळा वाटत होता. मी खिडकीतून डोकवून बघितले असता, बुलबुल, साळुंक्या, सुर्यपक्षी यांची धांदल उडाली होती. काहीतरी गडबड नक्कीच असणार असे मला वाटले.
एवढ्यात झाडामधे हालचाल दिसली. नीट निरखून बघितले असता, हा शिक्रा असावा असे वाटले. परंतु डोके पनांमधे झाकले गेल्यामुळे खात्री पटत नव्हती. पोटावर तांबुस तपकीरी रेषा स्पष्ट दिसत होत्या. एवढ्यात तो मागे वळून आपल्या चोचीने पाठ साफ करू लागला. आता मात्र तो पूर्ण दिसत होता. अणकूचीदार चोच, डोळे पिवळसर नारंगी व डोके करड्या रंगाचे. हा शिक्रा असल्याची खात्री पटली. ही मादी होती.
मी पटकन माझा कॅमेरा काढला आणि काही फोटो काढले. परंतु पानांमधे डोके झाकले गेल्यामुळे फोटो पूर्ण मिळत नव्हता. थोड्यावेळाने ती उडून शेजारच्या घराच्या टाकीवर बसली. आणि नंतर एका पाईपवर बसली. कदाचित ती पाणी शोधत असावी. माझा कॅमेरा तिच्यावर स्थिरावला आणि काही छान शॉट्स मिळाले. काही वेळाने ती तिथून उडून गेली.
या झाडावर मी प्रथमच शिक्रा बघितली.


© 2012 Abhijit Joshi Photography
Gear :  Canon EOS 7D, Canon EF 400mm f/5.6 L USM Lens


No comments: